बारामती औद्योगिक​ प्रगती …

औद्योगिक वसाहत मध्ये 32 एकर परिसरात इंडस्टीयल एरियात अनेकविध उद्योग सुरू झाले आहे. फॅब्रीकेशन, सिमेंट प्रॉडक्शन, चर्मउद्योग, शेती औजारे, ट्रक बांधणी, ग्रेनाईट कडाप्पा प्रोसेसिंग, एम.एस.एस.एस. फाऊंड्री, ऑईल मिल्स, बर्फ व रंग इ. अनेकविध छोटे-मोठे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेक लोकांना रोजगारी मिळून स्वयंरोजगाराचे समाधान मिळत आहे. औद्योगिक वसाहत (एम.आय.डी.सी.) : तसेच भिगवण रोडवर बारामतीपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर औद्योगिक विकास मंडळाने सुमारे 3000 एकरात आपले कार्यक्षेत्र सुरू केले आहे. उजनी धरणापासून  पाणीपुरवठ्याची सोय केली आहे. रोडच्या उजव्या बाजूस सुमारे 100 एकर परिसर राहण्यासाठी असून तेथे गेस्ट हाऊसेस, अद्ययावत हॉटेल्स, शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, शॉपिंग मार्केट, बँका, पोस्ट ऑफिस इ. सोयी याठिकाणी निर्माण झालेल्या आहेत.