बारामती शिक्षणाचे माहेरघर…​

शिक्षणक्षेत्रात बारामतीची  भरीव प्रगती झाली आहे. 

अनेकात एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज असून या कॉलेजमध्ये कला, वाणिज्य, शास्त्र अशा सर्व शाखा असून विद्यार्थी शिक्षत आहेत. म.ए.सो. हायस्कूल व कन्या शाळा  बालवाडीपासून 12 वीपर्यंत येथे शिक्षणाची सोय आहे. याच परिसरात विद्या प्रतिष्ठानची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. उत्तम शिस्त, 10 वीचा सातत्याने 100 % निकाल, एस.एस.सी. प्रमाणे आय.सी.एस.ई. सी.बी.एस.सी., चा अभ्यासक्रम हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. 

एम.आय.डी.सी. परिसरात विद्यानगरी येथे विद्याप्रतिष्ठान या संस्थेने भव्य शैक्षणिक संकुल उभे केले आहे. तेथे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालय, विधी महाविद्यालय, आय.टी. प्रशिक्षण, वनस्पतीशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, आर्कीटेक्चर महाविद्यालय इ. विभाग आहेत. मराठी व इंग‘जी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. लवकरच तेथे अनेकविध कोर्सेस सुरू होत आहेत. रयत शिक्षण संस्थेचे शाहू हायस्कूल, टेक्निकल हायस्कूल आहे. याशिवाय मिशन हायस्कूल, महात्मा गांधी बालक मंदिर, मोरोपंत बालक मंदिर व नगरपालिकेच्या 8 प्राथमिक शाळा आहेत.

बारामतीपासून 4 किलोमीटरवर शारदानगर हा शैक्षणिक परिसर आहे. येथे प्राथमिक शिक्षण, डी.एड, बी.एड, बी.पी.एड., आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेजची येथे सोय आहे. तसेच महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाचे, राहुरी विद्यापीठाचे, कृषी विकासचे प्रतिष्ठानचे अनेक अभ्यासक‘म चालू आहेत. बालवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण मिळण्याचे दृष्टीने हा परिसर आहे. येथूनच पुढे माळेगाव परिसरात सर्व सुविधांनी युक्त पॉलिटेक्नीक, इंजिनिअरिंग व फार्मसी कॉलेज आहे. नव्याने आकार घेतलेले मेडीकल कॉलेज व नियोजीत आयुर्वेद कॉलेज यामुळे बारामती एक शैक्षणक हब ओळखले जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *