बारामती क्रीडा

क्रीडा क्षेत्रातील प्रगतीही वाखाणण्यासारखी आहे. शाळा, कॉलेजच्या प्रशस्त मैदानावर अखिल भारतीय स्तरावरील खो-खो, हुतुतूचे सामने खेळले गेले आहेज. येथील निरनिराळ्या खेळाडुंची अखिल भारतीय पातळीवर निवड झालेली आहे. बारामती जिमखाना, यूथ फाऊंडेशन, बारामती क्रीडा प्रतिष्ठान इ. संस्था क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य करीत आहेत. राष्ट्रीय व कबड्डी व क्रिकेट स्पर्धा, बारामती तालुका कुस्तीगीर संघ या कार्याने त्यांनी बारामतीच्या क्रीडा विकासाला चालना दिली.