बारामती तालुक्याची अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे साखर कारखाने….
तालुक्यात माळेगांव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हे दोन कारखाने असून या माध्यामातून 50 हजार एकर क्षेत्र ऊस लागवडीखाली येत असून यातून सभासद व गेटकेन दोन्ही मिळून दरवर्षी अंदाजे 30 लाख टन उसाचे गाळप केले जाते. उसाला सरासरी 3000 रुपये टनाला भाव मिळतो. यामुळे तालुक्याची पुर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था यावर आधारीत आहे.
शेतमाल विक्री करीता हक्काची बाजारपेठ म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती.
बारामती तालुक्यात पिकणार्या शेतकर्यांच्या शेतमालाला उच्चतम बाजारभाव मिळावा याकरीता बाजार समितीची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून शेतकर्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो. समितीचे बारामती, जळोची, सुपे येथे कार्य चालत आहे. यांत्रीक चाळण, प्रोजक्शन टी.व्ही., यांत्रीक चाळण, सेलहॉल, वजनकाटा, जळोची बाजार जळोची, भाजीमंडई शेजारी 32 गाळे, शेतमाल तारण कर्ज योजना, शेतकरी बाजार, हमाल भवन, गांडुळ खत प्रकल्प, फळे व भाजी मार्केट जळोची इत्यादी सुविधा आहेत.
शेतकर्यांच्या दुधाला उच्च दर मिळवून देणारा बारामती दुध संघ….
बारामती तालुका दुध संघाच्या माध्यमातून तालुक्यातून 2 ते 2.5 लाख लिटर दुध रोज कलेक्शन करुन त्यापासून बायप्रॉडक्ट तयार केले जातात. संघामार्फत शेतकर्यांना व्हेटरनरी सुविधा, कॅन, चॉपकटर,मिल्कींग मशिन या सुविधा अनुदानावर तत्वावर जातात.