बारामतीच्या विकासाची पायाभरणी …..
बारामती हे तालुक्याचे ठिकाण असून पुण्यापासून 100 कि.मी. अंतरावर आग्नेय बाजूला आहे. बारामती तालुक्यामध्ये ज्या प्रकारे विकास होत आहे. त्यामुळे बारामतीचे नाव स्मार्ट टाऊन म्हणून गणले जावू लागले आहे. सहकार, शेती, शिक्षण, सामाजिक, क्रिडा अशा सर्वच क्षेत्रात बारामती अग्रेसर आहे. बारामती परिसरात 3 साखर कारखाने आहेत त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रकारे चालना मिळत आहे. तसेच सहकारी तत्वावर चालणार्या इतरही संस्था उदा. दुध संस्था, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी याही संस्थेचा फायदा शेतकरी वर्गाला होतो. सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्येही बारामतीने आघाडी घेतलेली आहे. विद्या प्रतिष्ठान, कृषी विकास प्रतिष्ठान, टी.सी.कॉलेज अशा शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर पायलट ट्रेनिंग, शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचीही भर पडली आहे. शेती विषयातही कृषी विकास प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र, तसेच क्रेंद्रीय शेती संशोधन केंद्र अशा संस्थांचाही मोठा सहभाग आहे. खरेतर बारामतीची बाजारपेठ अशा संस्थांमुळे तसेच येथील नेतृत्वामुळे प्रगतीपथावर आहे. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत बारामती अग्रेसर आहे. त्यामुळे गुंतवणूकीच्या निमीत्ताने जिल्ह्यातील नव्हेतर राज्यातील व राज्याबाहेरील व्यक्ती व संस्था बारामतीला प्राधान्य देतात. त्यामुळे बारामती औद्योगीक, शैक्षणिक, पर्यटन दृष्ट्या केंद्रस्थानी आहे.